Share

‘कोविड सेंटर ठाकरे सरकारचे कमाईचे साधन’; किरीट सोमय्या यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा कोरोना झपाट्याने पसरत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे यावर आवश्यक ते सर्व उपाययोजना राज्य सरकार तसेच स्थानीक प्रशासन करताना दिसत आहे. मात्र आता यावरही भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता कोविड सेंटरवरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना इशारा दिला आहे. येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी सोमय्या म्हणाले, मुंबईत कोरोनाचा रुग्णसंख्येचा आकडा जरी वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे पडले आहेत. याचा अर्थ ९८ टक्के रुग्ण आहे आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. ज्यांचे लसीकरण झाले त्यातील ९९.९९ टक्के लोक हे सुरक्षित आहेत, सत्ताधारी नेते आणि काही आयएएस अधिकारी यांच्यासाठी कोविड सेंटर हे कमाईचे साधन बनले आहे. येत्या दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा प्रसिद्ध करेन, असा इशारा सोमय्या यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!