Share

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर पेडणेकरांचे उत्तर; म्हणाल्या,’खुर्चीत गांजा मारून…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांनाच मुंबईत आता कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत असून काल एका दिवसात मुंबईत रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पार केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज(८ जाने.)मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी बीकेसी कोविड सेंटरची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या टीकेवर उत्तरही दिले आहे.

काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना किरीट सोमय्या यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि लॉकडाऊन या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला होता. ते म्हणाले होते की,’काही सत्ताधारी नेते स्वत:चे राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लाट,लॉकडाऊन अशा धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावे’, असे सोमय्या म्हणाले होते.

दरम्यान, सोमय्या यांच्या टीकेवर आता किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिले असून यासंदर्भात बोलत असतांना त्या म्हणाल्या की,’घाबरवणे हे आमच्या रक्तात नाही आणि आम्हीसुद्धा घाबरत नाही. खुर्चीत गांजा मारून कुणालाही बोलता येते. परंतु परिस्थिती तपासून पाहताना आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला धाडस दिलं आहे. उद्याच्या मृत्यूला मी घाबरत नाही. त्यामुळे तेवढं धाडस आपण दाखवावे’, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!