Share

“भित्रा व्यक्ती देशाचं नेतृत्व करु शकत नाही”, काँग्रेसचा मोदींना अप्रत्यक्ष टोला

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा दौरा पंजाबमध्ये अडवण्यात आला होता. पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे प्रकरण त्यानंतर समोर आले होते. मोदींची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच या मुद्द्यावरून भाजप नेत्यांसह मोदींनी काँग्रेसवर आरोप केला होता. जीवीतास धोका असल्याचेही भाजप नेत्यांनी स्पष्ट केले होते. त्यावर आता देशभरातील काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.

मध्यप्रदेश काँग्रेसने पंतप्रधान मोदींना नाव न घेता टोला लगावला आहे. मध्यप्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन ‘भीत्रा व्यक्ती देशाचं नेतृत्व करु शकत नाही’, असे ट्विट करण्यात आले आहे.

या प्रकरणावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना बघायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेले आहे. ७ जानेवारी रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली.

सुप्रीम कोर्टाने पंजाब आणि हरयाणाच्या उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांना पंतप्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्याचा रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधानांची सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, असं मत या प्रकरणात याचिका दाखल करणारे वकील मनिंदर सिंह यांनी यावेळी व्यक्त केलं. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाल्याचं सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटलं आहे. तर पंजाब ही घटना खूपच गांभीर्याने घेत असल्याचं अॅटर्नी जनरल डी. एस. पटवलिया यांनी यावेळी सांगितलं.

यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतल्या त्रुटींना जबाबदार कोण हे शोधलं जाईल आणि असा निष्काळजीपणा सहन करता येणार नाही, असे अमित शहा म्हणाले. गृह मंत्रालयाने याबाबतचा सविस्तर अहवाल मागवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!