🕒 1 min read
मुंबई: जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या तरुणाने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतींची रेकी केल्याची धक्कादायक घटना घडली असतानाच आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपुरात रेकी करण्यासाठी आलेला २६ वर्षीय तरुण विमानाने जुलै महिन्यात नागपुरात आला होता. सीताबर्डी परिसरातील एका हॉटेलमध्ये दोन दिवस त्याचे वास्तव्य होते. आता या घटनेवरच राज्यातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. जैश-ए-मोहम्मदच्या हस्तकांनी आरएसएसची रेकी केल्याची माहिती यापूर्वी पोलिसांनी दिली होती हा गुप्ततेचा विषय आहे. असा कुठलाही हमला महाराष्ट्रात होऊ शकत नाही. महाराष्ट्राचे पोलीस सक्षम आहेत.’ असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावरच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतींची जैश ए मोहम्मद कडून रेकी केली जाणे अतिशय गंभीर बाब आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. याची माहिती आता पोलिसांना आणि केंद्रीय यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे यासंदर्भात योग्य खबरदारी महाराष्ट्राचे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा घेतील असा विश्वास आहे. याला अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “महाभकास आघाडीला ‘क्लास पेक्षा ग्लास’ महत्वाचा”; सदाभाऊंची खोचक टीका
- आमच्या राजांनी कधीही कोणाची प्रार्थनास्थळे तोडली नाहीत- नितीन गडकरी
- महत्वाचे! आठवड्यात २ कोटी मुलांचे झाले लसीकरण
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय त्याचं आम्ही अगोदरच..” ममता बॅनर्जीं मोदींवर कडाडल्या
- “पंतप्रधान ओबीसी असतांना त्यांच्याकडून समाजाला अनेक आशा होत्या, परंतु…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
