Share

छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनात भाजप सहभागी होणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा

Published On: 

पुणे : मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले आहेत. काल शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे.

दरम्यान आता संभाजीराजे यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असेल. त्यांच्या आंदोलनात भाजप सहभागी होणार, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांचे नेतृत्व आम्हाला मान्यच आहे कारण ते आमचे राजे आहेत, भाजपाचे नेते आहेत. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्याच्या त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागतच करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनांमध्ये आम्ही सहभागी होणारच आहोत, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात केली आहे.

दरम्यान आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजेंच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. ‘संभाजीराजेंच्या डोक्यात राजकारण नाहीये. ते मराठा तरुणांचं संघटन करण्याचं विधायक काम करतायत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचे स्वरूप देखील ते समजदारवृत्तीने करतील,’ असं भाष्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!