🕒 1 min read
पुणे : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक विरुद्ध विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर गंभीर आरोप केले जात आहेत. तर, आता हा वाद सत्ताधारी विरुद्द विरोधक असा निर्माण होताना दिसत आहेत. मलिकांनी आज पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीसांवर अंडर्वर्ल्डशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
नवाब मलिकांनी आ बैल मार मझे असं सुरू केलेलं आहे. त्यांना धावता धावता कळत नाही की समोर खड्डा आहे. त्यांना केवळ निष्ठा कळते आणि त्या निष्ठेने ते मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे ते बोलत आहेत. पण त्यांना हे कळत नाही की ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत. रोज तेच कबुली देत आहेत की ही जमीन मी घेतली, ही कमी किमतीत घेतली. तेच मान्य करत आहेत की त्या जमिनी नंतर ज्यांना टाडा लागणार होता. नंतर ज्या जप्त होणार होत्या, त्या स्वतःत त्यांनी घेतल्या हे तेच मान्य करत आहेत. यामध्ये ते स्वतःची कबर स्वतः खोदत आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
नवाब मलिक सैरभैर झाले आहेत. आम्ही सर्वजण एकजुटीने देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी आहोत, देवेंद्र फडणवीस स्वतः कणखर आहेत. आता एकच पत्ता त्यांनी बाहेर काढला अजून अनेक पत्ते ते बाहेर काढतील. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा म्हणेन नवाब मलिक स्वतःची कबर स्वतः खणत आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- जेवढे कर्मचारी दाबाल तेवढे उसळून उठतील- प्रविण दरेकर
- राज्याच्या हिताच्या दृष्टीने एकदा विचार करा; संजय राऊतांचं कर्मचाऱ्यांना आवाहन
- कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका’
- सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी- देवेंद्र फडणवीस
- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पडळकर, सोमय्यांचा सहभाग; मुंबई पोलिसांकडून अटक


