🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून 350 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकाराने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. याचबरोबर, संपकरी आंदोलकांना प्रोत्साहन देणाऱ्यांना विरोधकांवर देखील मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला आहे. कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्यशासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले, असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी- देवेंद्र फडणवीस
- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पडळकर, सोमय्यांचा सहभाग; मुंबई पोलिसांकडून अटक
- गोळ्या घाला, फाशी द्या पण आम्ही आंदोलनावर ठाम; एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
- एसटीचा संप संपेना! मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
- पडळकर आणि सदाभाऊ कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का?-अनिल परब


