🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन अधिकच चिघळत असल्याचे दिसत आहे. एकीकडे राज्यसरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असले तरी एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशातच राज्यभरात सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला आता भाजपनेही जाहीर पाठींबा दिला आहे. आझाद मैदान येथे जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संबोधित केले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी राज्य सरकारने खेळू नये. सरकारने काढलेला जीआर तात्काळ रद्द करून एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाचा दोन ओळीचा नवीन जीआर काढावा व विलीनीकरणाच्या निर्णयाला तत्वतः मान्यता द्यावी. यात चालढकलपणा करण्यात अर्थ नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
आंदोलन दडपण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. जेवढे कर्मचाऱ्यांना दाबाल, तेवढे ते उसळून उठतील. कर्मचारी आझाद मैदानाताच नाही तर मंत्रालयात ही घुसायला मागेपुढे पाहणार नाहीत. राज्य सरकारने विलीनीकरणाची आधी घोषणा करावी, त्यानंतर त्याचे आर्थिक गणित मांडावे. आपण कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत की विरोधात, हे राज्य सरकारने स्पष्ट करावे, असेही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याच्या हिताच्या दृष्टीने एकदा विचार करा; संजय राऊतांचं कर्मचाऱ्यांना आवाहन
- कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका’
- सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी- देवेंद्र फडणवीस
- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पडळकर, सोमय्यांचा सहभाग; मुंबई पोलिसांकडून अटक
- गोळ्या घाला, फाशी द्या पण आम्ही आंदोलनावर ठाम; एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा


