Share

ठाकरे सरकारचा कलाकारांनाही दिलासा; राज्यातील थिएटर्स ‘या’ तारखेपासून होणार खुली

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. नोकऱ्या गेल्या. सर्वसामान्य नागरिकांना अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. राज्यातील शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, सिनेमागृह, नाट्यगृह हे सर्वच ठिकाणे बंद आहेत. मात्र कोरोनाची संख्या आता आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, प्रार्थनास्थळांपाठोपाठ चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. याबाबत सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे कलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!