Share

‘बळीराजाच्या पाठीशी ठाकरे सरकार खंबीरपणे उभे’, चंद्रकांत खैरेंची ग्वाही

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका सोयगाव तालुक्याला बसला आहे. डोंगराळ भाग असल्याने पिकांसह जमिनी वाहून गेल्या आहेत. अनेक घरांचे नुकसान झाले असून जनावरे दगावली आहे. यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत. तसेच सर्वतोपरी मदतीसाठी राज्यसरकार शेतकरी व नुकसानग्रस्तांच्या सदैव पाठीशी असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.

गेल्या काही दिवसात मराठवाड्याला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. शेतकऱ्यांचा खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी लव्हाळी, अंतापूर, टाकळी आदी गावात झालेल्या नुकसानीची घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अतिवृष्टी व पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची सूचना खैरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पाहणीदरम्यान आमदार उदयसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, तालुकासंघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे आदींसह अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. सोयगाव तालुक्यातील तिडका येथे थेट बांधवार जाऊन त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्या आहे. यावेळी कन्नड सोयगावचे आमदार उदयसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे, तालुकाप्रमुख केतन काजे, शिवसैनिक- युवासैनिक उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!