Share

‘सोमय्यांना रोखून भ्रष्टाचारावर पांघरूण पडेल’, या भ्रमातून ठाकरे सरकारने वेळीच बाहेर यावे’

Published On: 

मुंबई: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या आज कोल्हापुरात जाणार होते. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आहे. तर, आज त्यांना कराड येथेच पोलिसांनी रोखलं आहे. त्यामुळे सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. दरम्यान यावरूनच अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.

‘भाजपा नेते किरीट सोमय्या यांना कराड येथे रोखलं असून कोल्हापूरला जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. मात्र अशा मुस्कटदाबीने आपण जनतेचा आवाज बंद करू, भ्रष्टाचारावर पांघरूण घालू असा भ्रम जर ठाकरे सरकारला असेल तर त्यांनी या भ्रमातून वेळीच बाहेर यावे.’ असा इशारा अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत दिला आहे.

दरम्यान किरीट सोमय्या यांच्या पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी याठिकाणी घोषणाबाजीही केली आहे. तर याप्रकरणी सकाळी 9 वाजता किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!