Share

Airtel 5G नेटवर्कची गुरुग्रामध्ये चाचणी सुरू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मोबाईल नेटवर्क त्यानंतर इंटरनेट यांनी जगाला एक ग्लोबल व्हिलेज बनवलं सुरूवातीला टूजी थ्रीजी फोरजी आणि त्यानंतर आता येऊ घातलेला 5G यामुळे ग्राहकांना आता आणखी जलद गतीने इंटरनेटचा ॲक्सेस उपलब्ध होणार आहे. भारतात 5G नेटवर्कबाबत काम सुरू करण्यात आलं आहे. नुकतेच भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडियाला 5G चाचणीसाठी परवानगी देण्यात आली होती.

https://twitter.com/i/status/1404304983017725952

आता समोर आलेल्या माहितीनुसार 3.5 GHz बँडवर चालणाऱ्या Airtel 5G नेटवर्कची गुरुग्रामध्ये चाचणी सुरू करण्यात आली आहे. तसंच एका व्हिडीओमध्ये त्याचा 5G स्पीडही दाखवण्यात आला आहे. गुरुग्राममधील सायबर हब या परिसरात Airtel 5G ट्रायल नेटवर्क लाईव्ह करण्यात आलं आहे.

91 मोबाईल्सच्या माहितीनुसार हे नेटवर्क 3,500MHz बँडवर ऑपरेट केलं जात आहे. यात अतिशय यामध्ये 1GBPS पेक्षा अधिक स्पीड मिळत आहे. येत्या काही महिन्यात अन्य ठिकाणीही एअरटेलच्या 5G नेटवर्कची चाचणी होण्याची शक्यता आहे.

सध्या भारतात यावर वेगाने प्रयत्न केले जात आहेत.या बाबत एअरटेल क्वॉलकॉममध्ये करार करण्यात आला आहे. एअरटेल क्वॉलकॉमच्या मदतीने भारतात ५ जी सर्विस सुरू करणार आहे. एअरटेल क्वॉलकॉमच्या रेडीओ एक्सेस नेटवर्क प्लात्फोर्म चा वापर करून लोकांना ५ जी ची सुविधा देणार आहे. तसेच यासोबतच 5G फिक्स वायरलेस एक्सेस देण्यासाठी क्वॉलकॉम मोठी भूमिका बजावणार आहे

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!