Share

‘ठाकरे सरकार घातक ; मंत्र्यांना गाडी घ्यायला, ऑफिस सजवायला पैसे पण पूरग्रस्तांना मदत करायला नाहीत’

Published On: 

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2019 च्या निकषावरुन मदत देण्यात यावी, अशी मागणी करत राजू शेट्टी हजारो शेतकऱ्यांसह जल समाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. असंख्य शेतकऱ्यांसह राजू शेट्टी यांनी आंदोलन करत नृसिंहवाडीमध्ये पोहोचले होते.

दरम्यान आता पूरग्रस्तांच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलनाचा निर्णय अखेर माजी खासदार राजू शेट्टी यांनी सायंकाळी मागे घेतला. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलविल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा केली. दरम्यान , बैठक निष्फळ झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ज्यांना आम्ही आणलं ते महाविकास आघाडी सरकार एफआरपीचे तीन टप्पे करण्याचा विचार करत आहेत. हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने घातक आहे, अशी टीका करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. तसंच, राजू शेट्टींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेसाठी बोलावलं आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी नेतृत्वाखाली परिक्रमा यात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार टीका केली आहे. मंत्र्यांना गाडी घ्यायला, ऑफिस सजवायला पैसे आहेत.

मग पूरग्रस्तांना मदत करायला पैसे नाहीत का? केंद्र सरकार जर दुजाभाव करत असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रपती भवनवर मोर्चा काढावा, जर तुम्ही आंदोलनाला जात नसाल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना 2 रेल्वे घेऊन आंदोनासाठी जाईल. केंद्राला कोणी तरी ठणाकवून सांगितले पाहिजे, असा आक्रमक पवित्राच राजू शेट्टींनी घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!