पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष-आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार टीका-टिपण्णीचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी चंद्राकांत पाटील यांनी पाठीत खंजीर खुपसणारे दोन चेहरे समोर येतात असं म्हटल्यावर उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले होते. यावरून आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे.
संजय राऊत हे सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज शिरुर-हवेली इथे आले होते. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राऊत यांनी थेट चंद्रकांत पाटील यांनाच ललकारले. ‘चंद्रकांतदादा हरिश्चंद्राचे अवतार आहेत. आम्ही एकत्र काम केलंय. मी तर नेहमी आव्हान देतो शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो,’ अशी गर्जना संजय राऊत यांनी केली आहे.
यावर आता चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘वसंतदादा पाटलांचं काय झालं? आता पवारांवर केवळ पुस्तकच यायचं बाकी आहे,’ असा टोला पाटील यांनी लगावला आहे. ते म्हणाले, ‘आमचं म्हणणं शिवसेनेविषयी होतं. शिवसेनेने आमचा विश्वासघात केला आहे. 2014 ला संजय राऊतांनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. हे जगजाहीर आहे. 145 चा आकडा करण्याचे शिल्पकार हे संजय राऊत आहेत. राऊतांनी हे सरकार बनवलं आहे.’
यासोबतच, ‘राष्ट्रवादी भाजपची एका एका पंचायत समिती खातं आहे. काँग्रेस नसल्यात जमा आहे, असं सांगतानाच शरद पवारांवर फक्त पुस्तक येणं बाकी आहे. तरीही ते म्हणतात, खंजीर खूपसलं नाही. वसंतराव पाटलांच काय झालं?,’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली’ ; करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर आरोप
- राज्यात राजकीय संघर्ष; एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय – शरद पवार
- शेतकरी आंदोलक आक्रमक ; राकेश टिकैत यांनी केली २७ सप्टेंबरला भारत बंदची घोषणा
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- ‘गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले’; संजय राऊतांनी व्यक्त केली जाहीर नाराजी


