Share

‘…तर अजित पवार आणि अनिल परबांविरोधात देखील सीबीआय लागेल’; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

Published On: 

🕒 1 min read

पुणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याचा आरोप आणि 100 कोटी वसुली प्रकरणात एनआयएने सचिन वाझेला अटक केली आहे. सचिन वाझे हा अटकेत असतानाच वसुलीप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे देखील नाव घेतले होते. यानंतर भाजपने या दोघांची सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

जुलै महिन्यात पवार आणि परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. तर, भाजपने राज्यस्तरीय बैठकीमध्ये या दोन्ही नेत्यांच्या सोबीआय चौकशी करण्यासाठीचा ठराव मंजूर केला होता. आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सीबीआय चौकशीबाबत भाष्य केलं आहे.

‘अजित पवार आणि अनिल परबांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीसात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडे दिवस थांबा कार्यवाहीची मुदत संपत आली आहे. जर ती कार्यवाही झाली नाही, तर कोर्टात दाद मागणार. परमबीर सिंगाच्या पत्रावर सीबीआय लागली तर यांच्यावर ही लागेल,’ असा सूचक इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!