मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असणाऱ्या घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित असल्याचे सांगत विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत तर सत्ताधारी इतर राज्यातील घटनांचा दाखला देत आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना या घटनांवर देखील भाष्य केलं. ‘शक्ती कायदा करत असताना आमच्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत. शिवाय त्याचा कुणाला त्रास होता कामा नये. आई-वडिलांनी आपला मुलगा आणि मुलगी काय करते याकडे लक्ष दिले पाहिजे,’ असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
ठाकरे सरकार शक्ती कायदा का आणत नाही त्याचे उत्तर आज उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या वक्तव्यातून मिळाले. शक्ती कायद्यामुळे कुणाला त्रास होऊ शकतो अशी पवारांना भीती आहे. हे कुणी म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून मंत्री मंडळातील बलात्कारी आहेत. pic.twitter.com/0sAPt7Fbbh
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 24, 2021
अजित पवारांच्या शक्ती कायद्याबद्दल्या विधानावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘ठाकरे सरकार शक्ती कायदा का आणत नाही त्याचे उत्तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यातून मिळाले. शक्ती कायद्यामुळे कुणाला त्रास होऊ शकतो अशी पवारांना भीती आहे. हे कुणी म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून मंत्री मंडळातील बलात्कारी आहेत,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आई-वडिलांनी स्वतःची मुलं-मुली काय करतात याकडं लक्ष द्यावं, नराधमांना असं शासन झालं पाहिजे कि…’
- ‘ज्या माणसाने एका डॉक्टर महिलेला खोट्या केस मध्ये ५२ दिवस तुरुंगात ठेवलं, त्याने…’
- फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू मार्गे महत्वाचा पुणे ते बंगळुरू हा नवा हरित महामार्ग – गडकरी
- सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, पण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये; मुश्रीफांची सोमय्यांना तंबी
- सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं; खुद्द अजित पवार यांनी दिली कबुली


