पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असणाऱ्या घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित असल्याचे सांगत विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत तर सत्ताधारी इतर राज्यातील घटनांचा दाखला देत आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना या घटनांवर देखील भाष्य केलं. ‘शक्ती कायदा करत असताना आमच्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत. शिवाय त्याचा कुणाला त्रास होता कामा नये. आई-वडिलांनी आपला मुलगा आणि मुलगी काय करते याकडे लक्ष दिले पाहिजे,’ असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
यासोबतच, ’70 ते 75 टक्के घटना या जवळच्या लोकांकडून घडत असतात. त्यांना एवढं कडक शासन केलं पाहिजे की ते बघितल्यावर कुणाच्या मनात तस करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे,’ असा संताप देखील अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरु होणार पण…; शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती
- ‘ज्या माणसाने एका डॉक्टर महिलेला खोट्या केस मध्ये ५२ दिवस तुरुंगात ठेवलं, त्याने…’
- रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसलेत – भातखळकर
- सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, पण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये; मुश्रीफांची सोमय्यांना तंबी
- सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं; खुद्द अजित पवार यांनी दिली कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

