🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असणाऱ्या घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित असल्याचे सांगत विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत तर सत्ताधारी इतर राज्यातील घटनांचा दाखला देत आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणांवर भाष्य केलं होतं. ‘महिलांवर अत्याचार व्हावा असं कोणत्याच सरकारला वाटत नसतं. रावणालाही तसं वाटत नसेल. म्हणूनच रावणाने जेव्हा सीतेला पळवून नेले तेव्हा तिच्यावर अत्याचार केला नाही. तिला सन्मानपूर्वक अशोक वनात ठेवले,’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
ज्या डॉ महिलेला खोट्या केस मध्ये ५२ दिवस तुरुंगात ठेवलं, सातत्याने अनेक वर्षापासून छळतोय, तिला त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही त्या माणसाने महिला सन्मानच्या गोष्टी करु नये. pic.twitter.com/WcThXePgm9
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 24, 2021
संजय राऊत यांच्या या विधानाचा भाजप नेते निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘ज्या डॉक्टर महिलेला खोट्या केस मध्ये ५२ दिवस तुरुंगात ठेवलं, सातत्याने अनेक वर्षापासून छळतोय, तिला त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही त्या माणसाने महिला सन्मानच्या गोष्टी करु नये,’ असं खोचक ट्विट निलेश राणे यांनी केलं असून संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारचा महिला पोलिसांना दिलासा; कामाचे 4 तास होणार कमी
- कमालच ! सिंधुदुर्ग विमानतळ सुरु होण्याआधीच ‘या’ तारखेपर्यंतच तिकीट फुल्ल
- ‘परवा एका एकराला 18 कोटी दिले; आता लोकं भेटून सांगतात, दादा रस्ता तेवढा आमच्या शेतातून न्या’
- मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, ‘या’ तारखेला सुरु होणार शाळा
- परमबीर सिंह आणि देशमुखांना शोधण्यासाठी आता पोस्टर लावायची का? भाजपाचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
