🕒 1 min read
मुंबई : कालचा दिवस (२९ जून) इतिहासात कायम अधोरेखित केला जाईल. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काल रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. अनेक राजकीय घडामोडीनंतर अखेर महाराष्ट्रातील राजकारणावर पडदा पडला. त्यातच आज राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित केले होते. मात्र आता त्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करत सदरील अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे.
“राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ३० जून २०२२ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित केले होते. ज्या प्रयोजनासाठी अधिवेशन अभिनिमंत्रित केले होते, ते प्रयोजन आता आवश्यक राहिले नसल्याने राज्यपालांनी सदर अधिवेशन संस्थगित केले आहे.”, अशी माहिती विधानमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली आहे.
दरम्यान शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्याने आणि १० अपक्ष आमदारांनी साथ सोडल्याने महाविकास आघाडी सरकार आधीच संकटात आले होते. सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असे स्पष्ट दिसत असताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आता देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल नवे सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करतील. भक्कम संख्याबळासह फडणवीस पुन्हा सत्तेत येणे निश्चित आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Jitendra Awhad : महाविकास आघाडी सरकार कोसळले! जितेंद्र आव्हाडांनी सहकाऱ्यांचे मानले आभार
- Political Crisis : बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना १४९ ची नोटीस
- Sanjay Raut : आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांच भावुक ट्विट
- आस्तिक कुमार पांडे यांची बदली, ‘हे’ आहेत औरंगाबादचे नवे महापालिका आयुक्त
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
