Share

महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा भीमपराक्रम; मोडला स्वत:चाच ऑलिम्पिक रेकॉर्ड!

Published On: 

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय विक्रम केल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेत खेळणाऱ्या अविनाश साबळेने त्रिवेंद्रम येथे झालेल्या इंडियन ग्रांप्री-२मध्ये आणखी एक राष्ट्रीय विक्रम रचला. त्याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८.१६.२१ अशी वेळ नोंदवत आपलाच जुना विक्रम १.९१ सेकंदांने मोडित काढला.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहाव्या स्थानावर राहिलेली डिस्कस थ्रोअर कमलप्रीत कौर हिने ६१.३९ मीटर डिस्कस फेक करून सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या या स्पर्धेत हरयाणाच्या प्रशांत मलिकने ५४.१८ मीटरसह सुवर्णपदक जिंकले.

अविनाशने टोक्योमध्ये ८.१८.१२ अशी वेळ नोंदवली होती. हरियाणाचा शंकर लाल (८.३६.३७ मिनिटे) त्याच्या मागे होता. महिलांच्या स्पर्धेत यूपीच्या पारुल चौधरीने ९.३८.२९ मिनिटे वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले.

पुरुषांच्या शॉटपुटमध्ये, उत्तराखंडच्या अनिकेतने १७.४२ मीटरसह सुवर्ण आणि उत्तराखंडच्या अधिश घिलडियालने १६.४८ मीटरसह रौप्यपदक जिंकले. महिलांच्या या स्पर्धेत उत्तराखंडच्या रमनीत कौरने १३.८६ मीटरसह सुवर्णपदक जिंकले. हिमाचल प्रदेशच्या अंकेश चौधरीने ८०० मीटरमध्ये १.४८.२७ मिनिटे वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले.

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!