मुंबई: मविआ नेत्यांवरील ईडी धाडसत्र थांबण्याचे काही नाव घेईना. आता एक मोठी माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांना ईडीने दणका दिला आहे. ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांच्यावर कारवाई केली असून ठाण्यातील जमीन आणि दोन फ्लॅट जप्त केले आहेत. त्यात त्यांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान NSEL प्रकरणात त्यांचे संचालक, प्रमुख अधिकारी, 25 डिफॉल्टर आणि इतरांवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला आहे. दरम्यान वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे NSEL च्या कर्जदार/ट्रेडिंग सदस्यांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, थकित कर्जाची परतफेड आणि इतर गोष्टींसाठी वळवले असल्याचे ईडीने म्हटले आहे. आस्था ग्रुपकडे NSEL ची २४२.६६ कोटींची थकबाकी होती. आस्था ग्रुपने २०१२-१३ कालावधीत विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्टकडे २१.७४ कोटी वळते केले. त्यापैकी ११.३५ कोटी विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडे वळते करण्यात आले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान ईडीने प्रताप सरनाईक यांच्या नावे असणारे दोन फ्लॅट आणि जमिनीचा भाग जप्त केला आहे.त्यामुळे शिवसेनेच्या अजून एका मंत्र्यांवर ईडी कारवाई झाली आहे. यापूर्वी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्यामुळे मविआ नेत्यांवरील ईडी धाडसत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
आमदारांच्या मोफत घरांसंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी केला खुलासा; म्हणाले…
Women’s World Cup : अनस्टॉपेबल ऑस्ट्रेलिया..! स्पर्धेत नोंदवला सलग सातवा विजय
काय सांगता! अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठचे ब्रेकअप! चार वर्षांचं नात संपलं
“आमदार पळून जातील या भीतीनेच…”, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला जोरदार टोला
“आमचेच कच्चे दुवे, कच्चे मडके! हे दुर्दैवाने खरे” – राजू शेट्टींची खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

