Share

कसोटीचे महाभारत! सामना सतरावा/अखेरचा, पंतच्या शतकापुढे इंग्लड चारीमुंड्या चित

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा सतरावा आणि अखेरचा सामना इंग्लंडविरुद्ध ४ ते ८ मार्च दरम्यान अहमदाबाद येथे झाला होता.

डब्ल्युटीसी स्पर्धेतील हा अंतिम सामना होता. या सामन्यात विजय मिळवला तर भारतीय संघाचा डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चीत होता. मागील सामना दोन दिवसात संपल्याने भारताच्या खेळपट्टीवर सर्व स्तरातुन टिकेची झोड उठली होती. पुन्हा त्याच मैदानावर सामना होता. त्यामुळे पु्न्हा तेच होईल का याची भिती क्रिकेट रसिकांना वाटत होती. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय फिरकीपटु आर आश्विन आणि अक्षर पटेलच्या जोडीसमोर इंग्लंडचे खेळाडू पुन्हा अपयशी ठरले. इंग्लंडने पहिल्या डावात २०५ धावांची मजल मारली. अष्टपैलु खेळाडू बेन स्टोक्सने इंग्लंडकडुन सर्वाधीक ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. भारताकडुन पुन्हा अक्षर पटेलने सर्वाधीक ४ गडी बाद केले. तर आर अश्वीनने ३ गडी बाद करत त्याला साथ दिली. भारतीय संघाने पहिल्या डावात ३६५ धावांची मजल मारली. भारताकडुन रिषभ पंतने सर्वाधीक १०१ धावांची शतकी खेळी केली. त्याला वॉश्गिटंन सुंदर(९६*) आणि रोहित शर्मा (४९) यांनी पुरेशी साथ दिली. १४६ वर ७ गडी बाद असताना पंत आणि वॉश्गिंटन सुंदरने भाराताला संकटातुन बाहेर काढले. सुंदरने रिषभ पंत आणि अक्षर पटेल दोघासोबत शतकी भागीदारी करत भारतीय संघाला ३६५ धावांची मजल मारुन दिली.

भारताने पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात पुन्हा भारताच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि दुसऱ्या डावात केवळ १३५ धावांची मजल मारु शकला. यासह भारताने हा सामना एक डाव आणि २५ धावांनी जिंकत डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या डावात डॅनियल लॉरेन्सने सर्वाधिक ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडुन आर अश्विन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी ५-५ गडी बाद केले. शतकवीर रिषभ पंतला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

१७ सामन्याच्या या प्रवासात भारतीय संघाने अनेक चढ उतार बघीतले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या सामन्यातील ३६ धावांचा निचांक करणाऱ्या भारतीय संघाने फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना हा उद्यापासुन म्हणजे १८ जुनपासुन सुरु होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!