औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरातील सुमारे २५ हजार व्यावसायिक मालमत्तांच्या नळांना मीटर बसविण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सीईओ आस्तिक कुमार पांडेय यांनी घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या दोन महिन्यात केली जाईल. असे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील निवासी नळांना मीटर लागण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वीच व्यावसायिक नळांना मीटर लावण्याचा निर्णय पांडेय यांनी घेतला होता. या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, ज्या शहरात दररोज १२५ एमएलडी पाणी मिळत आहे. त्यामुळे पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. आणि पुरवठा यामध्ये सुधारणा केली जाईल. दरम्यान २५ हजार नळ कनेक्शन असल्याची महापालिकेकडे नोंद आहे.
या नळांना मीटर बसविण्याची प्रक्रिया येत्या दोन महिन्यात राबविण्यात येईल असे पांडेय यांनी नमूद केले. शहरात अनेकांनी निवासी मालमत्ता म्हणून नळ घेतले आहेत. पण वापर मात्र व्यवसायिक सुरू आहे. त्यांना पाणीपट्टी आकारण्यात अडचणी येत आहेत. व्यवसायिक मालमत्तांना देण्यात आलेले नळांना कनेक्शन लवकरच शोधण्यात आले असून त्याकरिता वॉटर मीटर बसविण्याची प्रक्रिया दोन महिन्यात सुरू केली जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतील वॉटर मीटरची खरेदी करण्यात येणार आहेत तसे पांडेय यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
- रासायनिक खते आणि सोयाबीन बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा; रयत क्रांती संघटेनची मागणी !
- शिर्डीचे साईमंदिर कधी उघडणार? खा.सुजय विखे म्हणाले..
- अभिनेत्रीने घरात भूत राहत असल्याचा सांगितला भयावह अनुभव
- ‘अशोक चव्हाणांनी जनहिताचे कामे करावीत’, खा.चिखलीकरांचा टोला
- शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर 22 कोटींचे कर्ज काढले, ऐन पावसाळ्यात करमाळ्यातील वातावरण तापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

