Share

कसोटीचे महाभारत! सामना चौदावा, कर्णधार रुटच्या द्विशतकामुळे इंग्लंडची भारतावर २२७ धावांनी मात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा चौदावा सामना इंग्लंडविरुद्ध ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान चेन्नई येथे झाला होता.

ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण करुन भारतीय संघ मायदेशी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला होता. यात कर्णधार विराट कोहलीचे संघात पुनरागमनदेखील झाले होते. डब्ल्युटीसी स्पर्धेसाठी न्युझीलंडचा संघ अंतिम सामन्यासाठी अधिच पात्र ठरला होता. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या निकालांनतर अंतिम सामन्यातील दुसरा संघ ठरणार होता. या शर्यतीत भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ होते. चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक गमावली. इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ५७८ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडच्या डावात कर्णधार जो रुटने सर्वाधिक २१८ धावांची द्विशतकी खेळी केली. त्याला डॉमिनीक सिब्ली(८७) आणि अष्टपैलु बेन स्टोक्स(८२) यांनी सुरेख साथ दिली. तर या डावात भारताकडुन बुमराह आणि अश्विन दोघांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात ३३७ धावांची मजल मारली. भारताकडुन यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने सर्वाधीक ९१ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला चेतेश्वर पुजारा(७३) आणि वॉश्गिंटन सुंदर(८५*) यांनी पुरेपुर साथ दिली. मात्र इतर फलंदाज अपयशी ठरल्यामुळे भारताला ३३७ धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडुन या डावात डॉम बेसने सर्वाधीक ४ गडी बाद केले. पहिल्या डावाच्या आधारावर इंग्लंडला २४१ धावांची भक्कम आघाडी मिळाली. मात्र २००१ कोलकाता कसोटीचा इतिहास लक्षात घेत इंग्लंडने भारताला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ केवळ १७८ धावांत गारद झाला. यावेळीही कर्णधार जो रुटने सर्वाधिक ४० धावांची खेळी साकारली. तर भारताकडुन आर अश्विनने सर्वाधीक ६ गडी बाद केले. १७८ धावांवर बाद होऊनही इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर भारतासमोर ४२० धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियातील आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि भारतीय रसिक पुन्हा विजयाची स्वप्ने बघु लागले.

सलामीवीर शुभमन गीलने शानदार अर्धशतक करत विजयाचे संकेत दिले. मात्र दिग्गज फलंदाजची फौज असलेल्या भारतीय संघ दुसऱ्या डावात केवळ १९२ धावांवर माघारी तंबुत परतला. यासह इंग्लंडच्या संघाने भारतावर २२७ धावांनी विजय मिळवला. या डावात कर्णधार कोहलीने सर्वाधीक ७२ धावांची खेळी साकारली. विरोधी संघाच्या मनात धडकी भरवणारा रिषभ पंत यावेळी केवळ ११ धावांवर बाद झाला. शभंराव्या कसोटी द्विशतक करणारा जो रुट हा जगातील पहिला खेळाडू ठरला. द्विशतकीय खेळीसाठी जो रुटला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!