🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी गुगलच्या सह-संस्थापकाच्या पत्नीसोबतच्या अफेअरचे वृत्त फेटाळून लावले आहे. गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन आणि ते मित्र असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या पत्नीसोबतच्या अफेअरच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत, असे मस्क म्हणाले. अमेरिकेच्या एका वृत्तपत्राने दावा केला आहे की, मस्क यांचे सर्गेईची पत्नी निकोल शानाहानसोबत अफेअर आहे. त्यामुळेच ब्रिनने या वर्षी जानेवारीत निकोलपासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
एलोन मस्क यांनी सोमवारी ट्विट करून या वृत्ताला प्रत्युत्तर दिले आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे कि, “या वर्षी चारित्र्य हत्येची नवीन पातळी गाठली आहे, परंतु हे लेख माझ्यासाठी काहीही नाहीत. मी वेड्यासारखे काम करतो. माझ्याकडे अशा गोष्टींसाठी वेळ नाही. या आरोपांमध्ये कोणत्याही प्रमुख व्यक्तीचा सहभाग नाही. मग तुम्ही त्यांची मुलाखत घेतली आहे का?”. अशा कडक शब्दात त्यांनी या अफवा पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. तसेच अफेअरच्या बातम्यांवर स्पष्टीकरण देत मस्क यांनी लिहले आहे कि, “हे सर्व निराधार आहे. सर्गेई आणि मी मित्र आहोत. काल रात्री आम्ही एका पार्टीत एकत्र होतो. गेल्या तीन वर्षांत मी निकोलला फक्त दोनदा भेटलो आहे आणि दोन्ही वेळा आमच्या आजूबाजूला बरेच लोक होते. यात रोमँटिक असं काहीही नाही.”
दरम्यान सर्गेई यांनी 2018 मध्ये निकोल शानाहानशी लग्न केले. निकोल हि लीगल टेकची संस्थापक आहे. 2018 मध्येच त्यांच्या मुलीचा जन्म झाला. यादरम्यान सर्गेई आणि निकोल एकत्र राहत होते. परंतु काही आठवड्यांनंतर, ब्रिनने परस्पर मतभेदांचे कारण देत घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यामुळे निकोल आणि सर्गेई यांच्या मतभेदांचे करा एलोन मस्क आहे, अशा चर्चा सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Manisha Kayande : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होत असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे – मनीषा कायंदे
- Ajit Pawar | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा; अजित पवार यांची मागणी
- Pankaja Munde | पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्स वरून भाजपचे नेते गायब
- Manisha Kayande : राज ठाकरेंनी स्वतःच्या मुलालाच राजकारणात पुढे आणलं, देशपांडेंना का नाही? – मनीषा कायंदे
- Uddhav Thackeray : राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये; शिंदेंचा ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
