🕒 1 min read
मुंबई : सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसतोय. यातच काही रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनांमुळे अनेकांना नाहक जीव गमवावा लागला. ही प्रकरणं ताजी असतानाच आज ठाण्यातील वर्तकनगर परिसरात असलेल्या वेदांत या कोविड रुग्णालयात चौघांचा अचानक मृत्यू झाल्याची खळबळजनक गोष्ट घडली.
या मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचं आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, रुग्णालयानं हे आरोप फेटाळले आहेत.
Maharashtra | Four #COVID19 patients died at Vedanta hospital in Thane early morning today. An investigation has been initiated to ascertain the cause of their death: Thane Municipal Corporation
— ANI (@ANI) April 26, 2021
या प्रकरणी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयास भेट देऊन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भिवंडीचे आयुक्त डॉ. पंकज अशिया यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांच्या समितीची नियुक्ती केली आहे. या समितीकडून या प्रकरणाची चौकशी करून प्रकरणाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.
#Vedanta Hospital Thane 6 #Covid_19 Patients Died due to defect in #Oxygen supply. COVID Patients Death in Hospitals in Maharashtra due to Oxygen & Fire becoming routine for #Thackeray Sarkar. Why #Minister #RajeshTope is not sacked? I am reaching Vedanta Hospital immediately
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 26, 2021
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा ठाकरे सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रोज राज्यात रुग्णालयात कधी आगीमुळे तर कधी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होतोय. मात्र आरोग्य मंत्री फक्त भाषण करत फिरतात, इतक्या घटना घडत असताना आरोग्य मंत्र्यांची हकलापट्टी का केली जात नाही? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच तत्काळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी पळविल्याची विरोधकांनी वावडी उठविली – भरणे
- पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून फेलोशिप मिळेना, बार्टीने अर्ज मागवले नाही
- टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
- ‘पवारांचे बस्तान बसविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आडून सोलापूर जिल्ह्याचा दिला जातोय बळी’
- मलिक, राऊत आणि आव्हाड महाराष्ट्राच्या जनतेची आणि मोदींची माफी मागतील का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
