Share

‘सामना सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात’, यावरून इंग्लंड महिला व पुरुष क्रिकेटपटूंमध्ये रंगलं ट्विट वॉर

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये होणारी ही डे-नाईट कसोटी म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी खास पर्वणीच ठरली आहे.

अहमदाबादमध्ये खेळण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड संघातील तिसऱ्या पिंक-बॉल टेस्ट सामन्यात इंग्लिश टीमच्या पराभवावर महिला संघाची खेळाडू अलेक्झांड्रा हार्टलेने केलेल्या एका ट्विटवरून इंग्लंडच्या महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंमध्ये सोशल मीडियावर सामना रंगला. इंग्लंडच्या महिला संघाचा न्यूझीलंड संघाशी गुरूवारी भारतीय वेळेनुसार रात्री वनडे सामना सुरू होणार होता.

सामना सुरू होण्यापूर्वीच अहमदाबाद कसोटी सामना संपुष्टात आला ज्यामुळे इंग्लंडची महिला खेळाडू हार्टलीने यासंबंधी ट्विट केले. ‘महिलांचा सामना सुरू होण्याआधी पुरूषांचा कसोटी सामना संपवल्याबद्दल इंग्लंडच्या संघाचे आभार. आता महिला क्रिकेट सामन्याचा आनंद लुटा, ‘तिने ट्विट केले. पण रोरी बर्न्सने त्वरित हार्टलीच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आणि निराशाजनक म्हटले.’ हे ट्वीट खूपच खेदजनक आहे. पुरूष खेळाडू नेहमीच महिलांच्या क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचे कर्तव्य बजावतात’ अशा शब्दात बर्न्सने हार्टलीच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!