Share

परभणी जिल्ह्यात ५ हजार ८९१ जणांना दिली कोरोना प्रतिबंधक लस

Published On: 

परभणी : जिल्ह्यात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह महसूल आणि अन्य खात्यांतील ५ हजार ८९१ जणांना शनिवारपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. शनिवारपर्यंत २ हजार ३७४ पुरुष तर ३ हजार ५१७ महिलांना लस देण्यात आली आहे.

सेलू उपजिल्हा रुग्णालयात ८८३, परभणी येथील जायकवाडी परिसरातील महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात ८६२, तालुक्यातील जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३९७, जिल्हा शासकीय रुग्णालयात ३८१, तालुक्यातील पिंगळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ९२, पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात ६६९ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.

गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात ५०२, जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात ५७६, मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात ५२०, पाथरी ग्रामीण रुग्णालयात ३७०, पालम ग्रामीण रुग्णालयात ३९० तर सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात २४९ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!