कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या निवडणुकांपूर्वी ममता बॅनर्जी यांचं सरकार ‘मां की रसोई’ हे योजना घेऊन येत आहे. या योजनेअंतर्गत गरीबांना केवळ पाच रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना डाळ, भात, एक भाजी आणि अंड देण्यात येणार आहे. सोमवारी १५ फेब्रुवारी रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
राज्य सचिवालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ममता बॅनर्जी या योजनेचं उद्घाटन करतील. या योजनेअंतर्गत सध्या कोलकात्यातील १६ बोरो कार्यालयात दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली जाईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक ठिकाणी जवळपास एक हजार लोकांना दुपारचं जेवण देण्यात येणार आहे. हळूहळू कोलकात्याच्या बाहेरही या योजना सुरू करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पुढील काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना काही ना काही आश्वासनं देण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार ‘मां की रसोई’ ही योजना सुरू करणार आहे.
काही दिवसांपूर्वी गौतम गंभीर यांनी देखील दिल्लीत जन रसोईची सुरूवात केली होती. या ठिकाणी त्यानं आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गरीबांसाठी एका रुपायात जेवण उपलब्ध करून दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईतील प्रसिद्ध राणीबाग उद्यापासून होणार खुली
- ‘…म्हणूनच “जेल पर्यटन” चालू केले असावे! जनता मंत्र्यांना अजुन कुठे भेटणार ?’
- ‘कोरोनामुळे अनेकांनी जवळची लोकं गमावली, त्यामुळे शिवजयंती…’
- ‘मोदींना “ते” दिसतं पण अडीच महिने शेतकरी हक्कांसाठी आंदोलन करतायत ते दिसलं नाही’
- ‘रोहिणी खडसे यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
