मुंबई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखुन दणदणीत पराभव केला. सलग तीन पराभव स्विकारल्यानंतर पंजाबने हा विजय मिळवला आहे. तर मुंबईचा हा सलग दुसरा तर स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला आहे.
पंजाबने नाणेफेक जिंकल्यांनतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वाना आश्चर्य वाटले, कारण चेन्नईच्या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणे सोपो नव्हते. मात्र कर्णधार राहुलचा विश्वास सार्थ ठरवत दुसऱ्याच षटकात सलामीवीर डीकॉकला(३) बाद करुन पंजाबला पहिले यश मिळवुन दिले. यानंतर पंजाबच्या गोलंदाजानी मुंबईच्या फलंदाजाना जखडुन ठेवले. पॉवरप्लेमध्ये मुंबईचा संघ केवळ २१ धावा करु शकला. इशान किशन (६) धावावर बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित(६३) आणि सुर्यकुमार यादव(३३) यांनी संघाचा डाव सावरला. दोघांव्यतिरीक्त इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. निर्धारित २० षटकात मुंबईने १३१ धावांपर्यंत मजल मारली.
मुंबईने दिलेल्या १३१ धावांचा पाठलाग करताना पंजाबने सुरुवातीपासुन सावध पण आक्रमक धोरण अवलंबले. पंजाबने आठराव्या षटकात ९ गडी राखुन विजय संपादन केला. मुंबई इंडियन्सने सामना गमावून देखील मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने खास विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहित शर्माने आयपीएलच्या अनेक पर्वांमध्ये विविध रेकॉर्ड्स केले आहेत. त्याने मुंबईला आतापर्यंत 5 करडंक जिंकून दिलेत. पंजाबविरुद्धच्या सामन्यात शुक्रवारी रात्री बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या रोहितच्या नावे 200 डावांत बॅटिंग करणारा फलंदाज म्हणून विक्रम नोंदवला गेला. त्याने पंजाबविरुद्ध खेळताना 200 डावात फलंदाजी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशा’ धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे – जयंत पाटील
- आज रंगणार केकेआरविरुद्ध आरआरमध्ये सामना ; दोन्ही संघांची आहे एकसारखीच स्थिती
- ‘संजय राऊत यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी’
- ‘कमी स्कोअरची खेळपट्टी आयपीएलची मजा घालवू शकते…’ ; स्टोक्सने व्यक्त केली नाराजी
- ‘रिकामी घरे, बंगले, हॉल, गाळे कोरोना रुग्णांसाठी द्या’; भरत जाधव यांचे नागरिकांना कळकळीचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

