Share

दूध का दूध आणि पानी का पानी होईल आणि अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील – मुश्रीफ

Published On: 

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. देशमुख यांच्या मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.खंडणी प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्या मालमात्तांवर छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईसह राज्यातील 10 ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सीबीआयने याप्रकरणी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आता सीबीआयच्या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते टीका करू लागले आहेत तर भाजपनेते या कारवाईचे स्वागत करताना दिसून येत आहेत. दरम्यान, देशमुख यांच्यावर झालेली कारवाई हा पूर्वनियोजित कटाचा भाग असून लवकरच दूध का दूध और पानी का पानी होईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस, परमबीरसिंग दिल्लीत गेले. पहाटे अमित शहांची भेट घेतली आणि एनआयएकडे हा तपास गेला. पुराव्यांशिवाय अशी चौकशी होऊ शकते का? सीबीआयकडे तपास गेल्यानंतर कोणत्याही पुराव्याशिवाय अशी चौकशी करणं म्हणजे भाजपानं विरोधी पक्षाच्या लोकांना बदनाम करण्यासाठी केलेलं कट-कारस्थान आहे. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. तो कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. लवकरच दूध का दूध आणि पानी का पानी होईल आणि अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील असं ते म्हणाले.

मुश्रीफ यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील या कारवाई बाबत भाष्य केले आहे. सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील या कारवाई बाबत भाष्य केले न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप करतानाच या प्रकाराचा  जयंत पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!