यवतमाळ : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यक्तिरिक्त सर्व दुकान बंद ठेवण्यात आली आहे. तसेच दारुच्या दुकांनानाही केवळ ऑनलाईन विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तळीरामांना दारु खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच यवतमाळमध्ये दारु न मिळाल्याने सॅनिटायझर प्यायलेल्या पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.
दारुची लत भागवण्यासाठी दारु म्हणून सॅनिटायझर प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली आहे. यवतमाळमध्ये ही घटना घडली आहे. यातील तिघांचा घरी तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे, गणेश शेलार अशी मृतांची नवे आहेत.
लॉकडाऊनमध्ये दारुची दुकान बंद आहेत. त्यामुळे दारुची लत भागवण्यासाठी यवतमाळमधील काही जणांनी सॅनिटायझर प्यायले आहेत. यात 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशा’ धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे – जयंत पाटील
- आज रंगणार केकेआरविरुद्ध आरआरमध्ये सामना ; दोन्ही संघांची आहे एकसारखीच स्थिती
- ‘संजय राऊत यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी’
- ‘कमी स्कोअरची खेळपट्टी आयपीएलची मजा घालवू शकते…’ ; स्टोक्सने व्यक्त केली नाराजी
- ‘रिकामी घरे, बंगले, हॉल, गाळे कोरोना रुग्णांसाठी द्या’; भरत जाधव यांचे नागरिकांना कळकळीचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

