चेन्नई : आयपीएलच्या या मोसमात राजस्थान रॉयल्सचा संघ सात्यत्याने अपयशी ठरत आहे. संजू सॅमसन याच्या नेतृत्त्वाखाली खेळणारी ही टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटी आहे. आत्तापर्यंत राजस्थानला या आयपीएलच्या मोसमात एकदाच विजय मिळवता आला आहे. या आयपीएलपूर्वी राजस्थाननं मोठी तयारी केली होती. आयपीएलच्या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर ख्रिस मॉरीसला तब्बल 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले.
आयपीएलच्या सिजनमध्ये मॉरीस हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मात्र मॉरीस या रकमेसाठी पात्र नाही, असं मत इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसन यांनी व्यक्त केलं आहे. ‘स्टार स्पोर्ट्स’ वरील एका कार्यक्रमा बोलताना पीटरसन म्हणाला, ” मॉरीस दक्षिण आफ्रिकेच्या टीमची पहिली पसंती नाही. त्याच्याकडून सर्वांच्या जास्त अपेक्षा आहेत. त्याच्याबद्दल खूप काही सांगितलं जात आहे, पण माझ्या मते तो सतत चांगली कामगिरी करु शकणारा खेळाडू नाही. त्याच्यात काहीही खास नाही. तो फक्त दोन मॅच चांगल्या खेळू शकतो, त्यानंतर पुढच्या मॅचमध्ये त्याची कामगिरी खराब असेल.”
पीटरसन पुढे म्हणाला, “राजस्थाननं मॉरीससाठी जास्तच पैसा खर्च केला. हे थोडं खराब वाटेल, पण माझ्या मते तो इतक्या पैशांसाठी पात्र नाही.” पीटरसन यांच्या या प्रतिक्रियेनंतर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- एकच सचिन वाझे की दोन-दोन सचिन वाझे आहेत, हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळेल – भातखळकर
- कारमधुन गांजाची वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिस कोठडी
- ‘संजय राऊत यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी’
- 80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या मोदींच्या निर्णयाचे आठवलेंनी केले कौतुक
- ‘मुख्यमंत्र्यांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज तर अचूक ठरला, पण तयारी काय केली ते सांगा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

