पुणे : पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेनंतर आता भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघांमध्ये एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची सुरुवात झाली आहे. या मालिकेत होणारे तीनही सामने पुण्यातील एमसीए (गहुंजे) स्टेडियमवर खेळवले जात आहेत. या सामन्यामध्ये कृणाल पांड्यासह प्रसिद्ध कृष्णा याने देखील एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं आहे. प्रसिद्ध कृष्णा सलामीवीर जेसन रॉय, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स यासारख्या खेळाडूंसह टॉम कुरणला बाद करून चार बळी आपल्या नावावर केल्या.
पहिल्याच सामन्यात एवढ्या दिग्गज खेळाडूंचा बळी घेत त्याने भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. यामुळे त्याच क्रिकेट रसिकांकडून कौतुक केलं जात आहे. त्यातच पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीचं तोंडभरुन कौतुक केलंय. त्याच्या या दमदार कामगिरीवर अख्तरने स्तुतीसुमनं वाहिली आहेत.
“तो कृष्णा नाही करिष्मा (चमत्कार) आहे…इंग्लंडच्या सलामीवीरांनी गोलंदाजीची पिसं काढल्यानंतरही त्याने ज्याप्रकारे पुनरागमन केलं ते चमत्कारापेक्षा कमी नव्हतं”, असं अख्तर आपल्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये म्हणाला. यासोबतच, चेंडू टाकताना स्पीड कधीही कमी होऊ देऊ नकोस असा सल्लाही अख्तरने कृष्णाला दिला.
“फलंदाजांनी आक्रमण केल्यानंतर दमदार पुनरागमन करण्यासाठी एक वेगवान गोलंदाज म्हणून तुम्ही तुमची हिंमत, कौशल्य आणि अॅटिट्यूड दाखवणं गरजेचं असतं.. ज्याप्रकारे त्याने चार बळी घेतले ती खूपच चांगली कामगिरी होती…अशीच कामगिरी करत राहा… फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की, जेव्हा केव्हा तुझ्या गोलंदाजीवर फलंदाज आक्रमण करतील तेव्हा गोलंदाजी करताना चेंडूचा स्पीड कमी होऊ देऊ नकोस. तुझं लक्ष फक्त यष्ट्यांवर ठेव आणि त्याच उडवण्याचं मनात ठरव…जेव्हा काय करावं हे कळत नसेल तेव्हा तुला फक्त हेच करायचंय! असं अख्तर म्हणाला. पुढे बोलताना, “गोलंदाजीचा स्पीड सतत वाढवत रहा, कधीच वेग कमी होऊ देऊ नकोस” असा सल्ला शोएबने कृष्णासाठी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही होणार विद्यापीठाच्या परीक्षा
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !


