Share

आईच्या आठवणीत अर्जुन व्याकूळ ; लिहिली भावुक पोस्ट !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आज आईच्या आठवणीने व्याकूळ झाला आहे. अर्जुनने सोशल मीडियावर अतिशय भावूक पोस्ट शेअर केली आहे.  9 वर्षपूर्वी आजच्या दिवशी अर्जुनची आई मोना शौरी कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला होता. आज मोना शौरी कपूर पुण्यतिथी आहे. त्यामुळे अर्जुन खूप भावूक झाला.

अर्जुन कपूरने इन्स्टाग्रामवर आईचा एक हसरा फोटो शेअर केला. या फोटोसोबत अर्जुने असे काही लिहिले की, 9 वर्षे झालीत मला तुझी खूप आठवण येते आई. आई प्लीज परत ये ना… तुझी माझ्याबद्दलची चिंता, माझी काळजी सगळे काही मी मिस करतो. माझ्या फोनवर तुझे नाव. जेव्हा तू मला फोन करायचीस. मी मिस करतो घरी येऊन तुझा तो चेहरा. तुझ्या चेह-यावरचे ते हास्य, तुझा तो सुगंध मी मिस करतो. अर्जुन म्हणून मारलेली तुझी हाक मी मिस करतो. तुझा आवाज आजही माझ्या कानात घुमतो…. तू जिथे असशील तिथे आनंदी असशील, अशी आशा करतो. मी ठीक राहण्याचा प्रयत्न करतो. अनेक दिवस काढतो, पण तुझी आठवण छळते… आई परत ये ना गं…,’ असे अर्जुनने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

आई मोना शौरी कपूर अर्जुनवर खूप प्रेम करायची आईचं निधन झाल्यांनतर त्याने आईच्या आठवणीत त्याच्या हातावर ‘माँ’ असा टॅटू गोंदवला. अर्जुन लहान असतानाच अर्जुनचेवडील बोनी कपूरने श्रीदेवीशी दुसरे लग्न केले होते. त्यावेळी अर्जुन लहान असल्यमुळे त्याच्या बालमनावर परिणाम  झाला त्यामुळे आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर मी कधीच लग्न करणार नाही, हे अर्जुनने ठरवून टाकले होते. पण या कटू आठवणी त्याने पुसून टाकल्या आहेत. आईची आठवण मात्र त्याला अजूनही कासावीस करते.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!