🕒 1 min read
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आज व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिपालीला एक उच्चपदस्त वन अधिकारी नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले, त्यावेळी दिपाली चव्हाण यांना त्यांनी झापल्याची माहिती आहे.
दिपाली यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाकला जाणारा दबाव व मानसिक त्रासाला कंटाळून दिपाली यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी 4 पानांचं सुसाईट नोट लिहल्याची माहिती कळतेय. त्यात काय लिहलंय हे अद्याप कळू शकले नाही.
दरम्यान,मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या दोषी अधिकाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची कुटुंबाची आणि वनपाल-वनरक्षक संघटनेची माहिती.मृतदेह पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाणार असल्याची माहिती आहे.दरम्यान, रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणाऱ्या आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अधिकाऱ्याने अशा पद्धतीने जीवन संपविल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, आता या घटनेनंतर भाजप, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आज लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला.विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे हरामखोर DCF शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा ही प्रयत्न केला. तिला अपमानित केल जात होतं.वांरवार DCF शिवकुमार संदर्भात केलेल्या तक्रारींवर वन संरक्षक रेड्डी यांनी कारवाई का केली नाही त्यांनी जर कारवाई केली असती तर दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. DCF शिवकुमार व वनसंरक्षक रेड्डी दोघांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी वाघ यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही होणार विद्यापीठाच्या परीक्षा
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
