बीड : राज्यात कोरोनााच उद्रेक होत आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवणे अवघड होत आहे. पण अद्यापही ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये सध्या अन्नधान्य वाटपासाठी ई-पास (थम इंम्प्रेशन ) ग्राहकांच्या बोटाचे ठसे घेण्यात येतात. यामुळे ठसे घेण्याचे यंत्रावरून एखाद्या संक्रमित रुग्णांकडून इतरांना संक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही प्रणाली सध्या काही कालावधीसाठी स्थगित करण्याची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
पत्रकात आ.धस म्हणाले की, ई-पास प्रणाली ही रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी आजवरची सर्वात प्रभावी यंत्रना ठरलेली आहे. पण सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हr प्रणाली काही कालावधीसाठी स्थगित करावी. त्याऐवजी स्वस्त धान्य दुकान परवानाधारक ते नायब तहसीलदार पुरवठा अधिकारी ते जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून दुकानदाराने ग्राहकाला धान्य वाटप केल्या बाबतचे फोटो पाठवावेत. किंवा तत्सम उपाययोजना करण्यात याव्यात. जेणेकरून धान्य वाटपामध्ये गैरप्रकार होणार नाहीत. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासही मोठी मदत या माध्यमातून होईल.
संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये देखील रुग्णांची वाढती संख्या भयावह आहे. ही महामारी नियंत्रणात आणण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून ई-पास (थंब इम्प्रेशन) प्रणाली तात्पुरती स्थगित करण्याची मागणी आ.धस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसे पत्र त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आगार व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
- ‘महात्मा फुले योजनेतंर्गत मोफत कोरोना उपचार देणे ही राज्याची जबाबदारी’, हायकोर्टाचे आदेश
- ‘बारामतीकरांकडून उजनीचे पाणी चोरण्याचा घाट’, खा.निंबाळकरांचा आरोप
- चक्क पोलीस अधिक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक खाते, मेसेजमधून मागितले पैसे!
- गैरप्रकार रोखण्यासाठी कोरोना रिपोर्टवर यापुढे ‘क्यूआर कोड’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

