Share

मंदिर बंद, उघडले बार ; उद्धवा धुंद तुझे सरकार!

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : गेले ६ महिने कोरोनाने राज्यासह देशात देखील थैमान घातला आहे. कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. तर, जून महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरु केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आता अनलॉक- ५ लागू करण्यात आला असून रेस्टोरंट, बार देखील सुरु करण्यात आले आहेत.

येत्या काही दिवसात सिनेमागृहे देखील सुरु करण्यात येतील मात्र राज्य सरकारने मंदिर खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. नवरात्रोत्सव देखील तोंडावर आला असून राज्यातील साडेतीन शक्तीपीठांचे लाखो भाविक भक्त दर्शन घेत असतात त्यामुळे होणाऱ्या उलाढालीवर तीर्थक्षेत्रातील व्यापारी व इतर घटकांना देखील रोजगार उपलब्ध होत असतो. यंदा मात्र कोरोनाचे संकट या उत्सवावर कायम असून व्यापाऱ्यांचा रोष आता वाढत आहे.

तर, भाजपसह वंचित बहुजन आघाडीने देखील मागील महिन्यात प्रार्थनास्थळे सुरु करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं होतं. भाजपने घंटानाद आंदोलन करून देखील कुंभकर्णापेक्षा गाढ झोपेत असलेल्या सरकारला जाग कधी येणार असा उद्विग्न सवाल करण्यात आला होता. तर, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वारकरी संघटनांसोबत आंदोलन करत पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात प्रवेश करून आंदोलन करण्यात आलं.

मात्र, अजूनही मंदिर खुले करण्याबाबत सरकारने पावले उचलले नसल्याने भाजपने महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत लाक्षणिक उपोषणाचे आयोजन केले आहे. भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ‘ ठाकरे सरकारने मंदिरा ऐवजी मदिरा सुरु केले असून संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मंदिर बंद, बार सुरु असे काळे चित्र निर्माण केले असून १३ ऑक्टोबरला विविध संप्रदायातील साधू-संत व अध्यात्मिक संघटनांना सोबत घेऊन लाक्षणिक उपोषण करणार’ असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!