मुंबई: ‘स्पिनचा जादूगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेन वॉर्नचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले. त्याचे जाणे क्रिकेट जगतासाठी मोठी पोकळी निर्माण करून गेले आहे. खेळाच्या दिवसात प्रतिस्पर्धिकडून सर्वात जास्त हेटाळला जाणारा वॉर्न निवृत्तीनंतर सगळ्यांचा जिवलग बनला होता. त्याचे प्रत्येक संघात मित्र आहे ज्याचे त्याच्यावर प्रेम होते. असाच एक म्हणजे शोएब अख्तर. शोएबने नुकतीच वॉर्न सोबतची एक आठवण शेअर केली आहे.
वॉर्नच्या (shane warne) मृत्यूनंतर अनेक खेळाडूंनी त्यांच्या महान फिरकीच्या आठवणींना उजाळा देत वॉर्नला श्रद्धांजली वाहिली जात आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही (shoaib akhtar) वॉर्नशी केलेल्या गप्पांची आठवण करून दिली आणि वॉर्नने त्याला विकेटची संख्या न बघता त कसा खेळतो याकडे लक्ष देण्यास सांगितले.
शोएब अख्तरने सांगितले, त्याने एकदा वॉर्नला त्याची कारकीर्दबद्दल चर्चा केली जाईल का असे विचारले होते. त्यावर वॉर्नने “शोएब, तुम्ही क्रिकेट कसे खेळता हे लोकांना आठवते’, तुम्ही किती विकेट्स घेतल्या हे नाही, तर तुम्ही ज्या पद्धतीने खेळलात ते महत्वाचे आहे,” वेगवान गोलंदाज असलेल्या शोएबने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. ज्यामुळे वॉर्नने त्याला दिलेला सल्ला खरा ठरला.
रविवारी शेन वॉर्नचा कुटुंबीय आणि मित्रांनी एका खाजगी कार्यक्रमात अंत्यसंस्कार पार पाडला . निवृत्त ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार मार्क टेलर, अॅलन बॉर्डर आणि मायकेल क्लार्क यांच्यासह सुमारे ८० लोक या सेवेत सहभागी झाले होते. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनसह त्याचे सहकारी आणि ऑस्ट्रेलियाचे महान खेळाडू मार्क वॉ, मर्व्ह ह्यूजेस, ग्लेन मॅकग्राथ आणि इयान हीली देखील वॉर्नला शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- “…त्यात विलन एक इच्छाधारी नाग असतो अन्”, निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
- पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा अजब दावा ; म्हणाला “पीचबद्दल कम्प्लेंट असेल तर क्रिकेट खेळणे सोडा”
- यशवंत जाधव यांच्यावर कारवाईची मागणी घेऊन किरीट सोमय्यांनी गाठली दिल्ली
- IPL 2022 : ना रोहित, ना विराट, ना धोनी..! श्रेयस अय्यरचा आवडता कॅप्टन ठाऊक आहे का?
- “…या कल्पनेने साहेबांचा तोल गेलाय”, भातखळकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

