मुंबई: मॉर्निंग कन्सल्ट (Morning Consult) या कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) लोकांची मान्यता असलेल्या नेत्यांमध्ये जगात पहिल्या क्रमांकाचे नेते ठरले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत दिली होती. यावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis ) यांनीही मोदींचे कौतुक करणारे ट्वीट केले आहे.
“सुशासन, निःस्वार्थ-अथक राष्ट्र आणि लोकांची सेवा काय देते? केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वात प्रेमळ नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक होत आहे. ते पुन्हा एकदा भारताचे जागतिक नेते ठरले आहेत!”, असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
What does good governance, selfless-tireless service to Nation & it’s people render?
An applaud and appreciation as the most loveable leader & not just in India but globally – Hon PM @narendramodi ji is truly India’s global leader, once again !#NarendraModi @MorningConsult https://t.co/rVKiaQZqij— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 21, 2022
दरम्यान नारायण राणे यांनी ट्वीट करत म्हटले होते की, “खरंच हा अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील लोकमान्यता असलेल्या नेत्यांमध्ये तब्बल ७७% रेटिंग मिळालं आहे. यामुळे ते पुन्हा एकदा ते सध्याच्या काळातील जगातील सर्वात मोठे नेते ठरले आहेत. हे रेटिंग जून २०२१ मधील ६६% टक्क्यांवरून नोव्हेंबर २०२१ मध्ये ७७ टक्क्यांवर गेलं आणि त्यानंतर आता ७७% वर आहे. यामुळे ही अभूतपूर्व वाढ आहे.”
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022: कोच फ्लेमिंगने केला खुलासा ; सांगितले चेन्नईचे सुरतमध्ये ट्रेनींग करण्यामागील कारण
- “भाजपच्या पाठबळामुळेच या…”, ‘द कश्मीर फाइल्स’वरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका
- महाराष्ट्राच्या दुश्मनांसाठी शिवचरित्र हा एक धडा आहे- संजय राऊत
- ‘आयपीएलनेच मार्केट बनवलंय’ पाकिस्तानी पत्रकाराला रॉबिन उथप्पाचे सडेतोड उत्तर
- एमआयएमने दिलेल्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा एक राजकीय…”

