मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस चिघळत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर हिंदुत्वावरून केलेल्या टीकेला आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘भाजपवाले कधीपासून हिंदू झालेत हे पाहावं लागेल’, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. तसेच महाराष्ट्रावर चालून येणाऱ्यांची बोटं छाटली जातील असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, भाजपचे हिंदुत्व हे त्वचेसारखं आहे. तर, शिवसेनेचे हिंदुत्व शालीसारखं असल्याचे वक्तव्य भाजप नेत्यांनी केले होते. त्यावरून शिवसेनेचे नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा अजब दावा ; म्हणाला “पीचबद्दल कम्प्लेंट असेल तर क्रिकेट खेळणे सोडा”
- “…त्यात विलन एक इच्छाधारी नाग असतो अन्”, निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
- “…या कल्पनेने साहेबांचा तोल गेलाय”, भातखळकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- IPL 2022 : ना रोहित, ना विराट, ना धोनी..! श्रेयस अय्यरचा आवडता कॅप्टन ठाऊक आहे का?
- यशवंत जाधव यांच्यावर कारवाईची मागणी घेऊन किरीट सोमय्यांनी गाठली दिल्ली


