मुंबई : अभिनेता आणि समीक्षक कमाल रशीद खानने ट्विटरवर आमिर खानला टोमणे मारले आहेत. हे वादग्रस्त ट्वीट सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. केआरके त्याच्या ट्वीट्समुळे सतत चर्चेत असतो. अशातच त्याने अमीर खानला देखील सोडले नाही.
केआरकेने आमिर खानची खिल्ली उडवणारा ट्वीट केलं आहे. तो म्हणतो की, ‘आमिर खानने आपण खरा देशभक्त असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांची पत्नी म्हणाली होती की, मला या देशात भीती वाटते. देश सोडून जाऊ. भावाने पत्नीला सोडले, पण देश सोडला नाही.
आमिर खान ने साबित कर दिया है, कि वो सच्चा देशभक्त है!
उसकी बीवी ने बोला था, कि देश में डर लगता है! देश छोड़ दो!
भाई ने बीवी छोड़ दी, लेकिन देश नहीं छोड़ा????— KRK (@kamaalrkhan) March 22, 2022
केआरकेच्या या ट्विटवर सोशल मीडिया यूजर्सच्या जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत. काही जण त्याला कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात कमेंट करू नका असे सांगत आहेत, तर काहीजण कमेंट सेक्शनमध्ये आमिरला ट्रोल करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


