मुंबई : आयपीएलचा हंगाम जवळ आला की सोशल मीडिया, टीव्ही आणि इतर व्यासपीठांवर संबंधित खेळाडूंविषयी तर्क-वितर्क मांडले जातात. अनेक चर्चांमधून विशिष्ट खेळाडूची चाचपणी केली जाते. अनेक जाणकार ज्यांना आपण एक्पर्ट्स म्हणतो, ते आपल्या सखोल ज्ञानाच्या जोरावर मते देतात. आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे, अशातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नामवंत क्रीडातज्ञांनी एका भारतीय क्रिकेटपटूला विदेशी संबोधले आहे, इतकेच नव्हे, व्यासपीठावर बसलेल्या चारही व्यक्तींना त्यांची ही चूक लक्षात आली नाही. या कार्यक्रमाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ स्पोर्ट्स तकच्या शोचा आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटर शेल्डन जॅक्सनबाबत चर्चा होत आहे. यादरम्यान ४ पत्रकारांची एक चौकडी शेल्डन जॅक्सनला परदेशी खेळाडू म्हणत आहे. यामुळे शेल्डनही सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहे.
This is height of comedy! The so called cricket experts on #SportsTak are continuously calling Sheldon Jackson a foreign player. Shame! pic.twitter.com/aNTPEbh3xX
— راغب रागीब (@dr_raghib) March 22, 2022
Shame on @sports_tak ????
They are Called Cricket Experts????
inse Jaada Achi Knowledge to Hamare Fantasy Players ko Hoti Hai????
Sheldon Jackson ko Foreign Player Bol rhe hain????@aajtak @vikrantgupta73 #SportsTak #vikrantgupta #aajtak https://t.co/HRDK6MOoRE
— Anurag Dwivedi ???? (@AnuragxCricket) March 23, 2022
वास्तविक, या शोचा सर्वेसर्वा प्रसिद्ध क्रीडा पत्रकार विक्रांत गुप्ता आहे. विक्रांतला क्रीडा पत्रकार म्हणून २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शोदरम्यान विक्रांत असूनही शेल्डन जॅक्सनला सतत परदेशी खेळाडू म्हटले जात आहे. शोमध्ये क्रिकेटवर चर्चा करणारे हे पत्रकार नवखे नाहीत, ते गेल्या अनेक वर्षांपासून या शोमध्ये क्रिकेटवर चर्चा करत आहेत.
कोण आहे शेल्डन जॅक्सन?
शेल्डन जॅक्सन हा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आहे. तो सौराष्ट्रकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो. जॅक्सनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्राचे नेतृत्वही केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, असे असूनही त्याला आजपर्यंत टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

