महाराष्ट्र देशा टीम : राज्यात जे टीमवर्क आहे ते खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे. आपण सगळेजण एकसंध कसे राहात आहोत हे पाहिलं जातं आहे. आपल्याकडे रुग्णांची वाढ होते आहे ही बाब चिंतेची आहे. करोना आपल्या मागे लागला आहे. मात्र करोनाच्या मागे आपण हात धुवून लागलो आहोत. असं उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेला सांगितले आहे.
घरी बसून सगळ्यांना कंटाळा आला आहे. पण सध्या आपल्याकडे काहीही इलाज नाही. घरात राहूनही आपली जनता तणावमुक्त कशी राहिल हे वृत्तवाहिन्यांनी पहावं असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले, “दुकानात जाऊन मास्क विकत घेण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरीही कापडाचा मास्क तयार करा आणि तो वापरा. मास्क हे छत्रीसारखे वापरु नका. ज्याचा मास्क आहे तो त्यानेच वापरावा. मास्क अत्यंत दक्षतेने वापरा. एकाचा मास्क दुसऱ्याने वापरु नका असंही त्यांनी ते स्पष्ट केलं. जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
