Share

तेलंगणाने नुकसानभरपाई केली जाहीर, महाराष्ट्रात मात्र ‘प्रतीक्षाच’ !

Published On: 

🕒 1 min read

हैद्राबाद : सद्या शेतकऱ्यांवर चहूबाजुंनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा अशा असंख्य अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला नुकत्याच झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे हाती आलेलं सोन्यासारखं पिक देखील गमवावं लागलं आहे.

महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने खाणार काय? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या २ दिवसांत अनेक नेत्यांनी दौऱ्यांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील मराठवाडा दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काल बारामतीपासून दौऱ्याला सुरुवात केली.

पालकमंत्र्यांसह विविध खात्यांचे मंत्री आणि आमदार-खासदार देखील पाहणी करत आहेत. मात्र, ठोस नुकसानभरपाई कधी ? यावर कोणीच बोललं नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तेलंगणात देखील पावसाने हाहाकार म्हजवळ होता. याच पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मदतीची घोषणा केली आहे. पूरग्रस्त भागातील घरांसाठी १० हजार रुपयांची तात्काळ मदत तर, पूर्णपणे उध्वस्त झालेल्या घरांसाठी १ लाख रुपये आणि काही प्रमाणात नुकसान झालेल्या घरांसाठी ५० हजारांची मदत तेलंगणा सरकारने घोषित केली आहे. यासाठी चंद्रशेखर राव यांनी ५५० कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

तेलंगणाने जाहीर केलं आता महाराष्ट्रात कधी ?

तेलंगणाने मदत जाहीर केली असून महाराष्ट्रात कधी? असा प्रश्न केला जात असून पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. मदत जाहीर झाल्यानंतर ती प्रत्यक्ष नुकसानग्रस्तांना मिळण्यासाठी अधिकच वेळ देखील जातो मात्र तोवर संसार कसा चालवायचा यावर मात्र नागरिकांना स्वतःलाच मेळ बसवावा लागणार असल्याचं चित्र आता समोर उभं राहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!