Share

अखेर ‘आयटम’ विधानप्रकरणी कमलनाथांची दिलगिरी !

Published On: 

🕒 1 min read

भोपाळ : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे रविवारी डबरा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्या प्रचार सभेत सहभागी झाले होते. यावेळी मतदारांना संबोधित करताना कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा जास्त ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला पाहिजे होते की, त्या काय आयटम आहेत, असे कमलनाथ यांनी इमरती देवी यांचे नाव न घेता टीका केली.

यानंतर, कमलनाथांच्या या वक्तव्याचा भाजपसह अन्य पक्षांनी देखील जाहीर निषेध केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील संताप व्यक्त करत काँग्रेसवर निशाणा साधला होता.महिलांच्या सन्मानाचा बुरखा चढवणाऱ्या काँग्रेसने आणि सोनिया गांधींनी यावर लगाम घालावा, अशी टीका मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली होती.

दरम्यान, यानंतर चूक मान्य करण्याऐवजी तो एक सामान्य शब्द आहे असं म्हणत आपल्या चुकीचं समर्थन केलं होतं. इमरती देवी यांना या अपमानजनक वक्तव्यानंतर रडू कोसळलं होतं. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने मध्यप्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी केलेल्या अपमानास्पद आणि बेजबाबदार वक्तव्याची निंदा केली आहे.

कमलनाथांच्या वक्तव्याबद्दल महिला आयोगाने स्पष्टीकरण मागितलं असून निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशा सूचना देखील दिल्या आहेत. आता, कमलनाथ यांनी आपल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करताना भाजपवर टीका केली आहे. ‘भाजपला आपल्या पराभवाची जाणीव झाली आहे. त्यामुळेच मूळ मुद्द्यांपासून जनतेला भरकटवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना जे काही बोलायचं ते बोलू देत, आपण त्यांना यश मिळवू देणार नाही’, असा पलटवार देखील त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!