Share

ऑस्ट्रेलियाला लोळवल्यानंतर इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज 

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया :  ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील बॉर्डर-गावसकर मालिकेतील मंगळवारी(19 जानेवारी) शेवटचा सामना पार पडेल. त्यानंतर भारत आणि इंग्लंड संघात कसोटी मालिका भारतात होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड मंगळवारी (19 जानेवारीला) होणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी पालकत्व रजेवर असलेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. त्याचबरोबर दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया सहभागी न झालेला इशांत शर्मा इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज आहे.

इंग्लंड विरुद्ध होणार्‍या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी मंगळवारी (19 जानेवारी) भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. या संघाची निवड नवीन निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी 5 वाजता पार पडेल. परंतु दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेतून बाहेर पडलेले जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांच्या निवडीवर शंका व्यक्त केली जात आहे. कारण भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका 5 फेब्रुवारी पासून चेन्नई येथे सुरू होईल. त्यामुळे अपेक्षा आहे की पहिल्या कसोटी सामन्यपूर्वी वरिष्ठ खेळाडू फिट होतील.

त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा(अंगठय़ाला फ्रॅक्चर), हनुमा विहारी(मांसपेशीमध्ये ताण) आणि उमेश यादव (मांसपेशीमध्ये ताण)हे खेळाडू दुखापतीमुळे भारतीय संघाच्या निवडीसाठी उपलब्ध नसणार आहेत. त्यांच्याऐवजी दुसर्‍या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.

चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नवीन निवड समिती जास्त नवीन प्रयोग करणार नाही. कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फिट असणारे खेळाडू भारतीय संघात स्थान मिळण्याचे हक्कदार आहेत. चेन्नई येथे खेळल्या जाणार्‍या सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यासाठी (5 ते 9 फेब्रुवारी आणि 13 ते 17 जानेवारी) भारतीय संघातील खेळाडूंना 27 जानेवारीला जैव सुरक्षित वातावरणात सहभागी व्हावे लागणार आहे. बीसीसीआय पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी 16 ते 18 खेळाडूंची निवड करण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त काही नेट गोलंदाजांची सुद्धा निवड करू शकते.

भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू इशांत शर्मा मांसपेशीमध्ये ताण आल्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सहभागी झाला नव्हता. मात्र तो आता फिट झाला आहे. त्यामुळे तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे तो जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज सोबत वेगवान गोलंदाजीचे आक्रमण म्हणून सहभागी होवू शकतो. त्याचबरोबर शार्दूल ठाकूर आणि नटराजन हे राखीव खेळाडू म्हणून सहभागी केले जाऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!