Share

न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया अंतिम लढत ; सामन्यापूर्वीचं पावसाचं सावटं

Published On: 

इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला आज पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला अवघे काही तासच उरले आहेत. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत. आज दुपारी ठीक अडीज वाजता विराट आणि केन नाणेफेकीसाठी मैदानात जातील. आतापर्यंतच्या सगळ्यात प्रतिक्षेत असलेली नाणेफेक उडवली जाईल. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्याला ठीक तीन वाजता होणार आहे.

https://twitter.com/DhirajC07244246/status/1405728725669355520?s=20

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पहिल्याच दिवशी मात्र पावसाचं सावट असल्याचं दिसत आहे. इंग्लंडमध्ये पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे हा पाऊस सामन्यात अडथळा आणू शकेल असा प्राथमिक अंदाज आहे.

https://twitter.com/IamKalyanRaksha/status/1405729304105807879?s=20

अंतिम सामन्याआधी साऊथॅम्प्टनचे हवामान खूपच खराब असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान अहवालानुसार 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टनमध्ये पावसाची शक्यता आहे. दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचा परिणाम अंतिम सामन्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामने पुढे जाऊ शकतात किंवा त्यांच्या वेळेत बदल होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!