इंग्लंड : फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा होत आहे. त्याने पत्रकार परिषदेत त्याच्या जवळील कोका-कोलाच्या दोन बाटल्या उचलून दूर ठेवल्या आणि पाण्याची बाटली जवळ ठेवली. ही कृती करताना रोनाल्डोने पोर्तुगीज भाषेत ‘‘एगुआ’’ म्हणजेच ‘‘पाणी प्या’’ असा संदेश दिला. रोनाल्डोचा हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर अनेकांचे प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि क्षणार्धात यावर मिम्सचा वर्षाव होऊ लागला.
दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर चर्चेत आले. श्रीधर यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार रोनाल्डो याची थट्टा केली. श्रीधर पत्रकार परिषदेला आले त्यावेळी टेबलवर कोका कोलाची बॉटल होती. भारताच्या फिल्डिंग कोचनं ती पाहून मजेत विचारले की मी ही बॉटल दुसरीकडं ठेवू का? याची काय किंमत असेल? माझ्यासाठी देखील ही बॉटल ठेवली आहे का?
https://twitter.com/pant_fc/status/1405919485094096898?s=20
रोनाल्डोच्या या कृतीमुळे कोको कोला कंपनीला २९ हजार कोटीचा तोटा सहन करावा लागला आहे. रोनाल्डोच्या कृतीमुळे मोठा आर्थिक फटका बसलेल्या कोका कोलाने या घटनेवर प्रतिक्रिया देताना ‘काय प्यावे यासाठी प्रत्येकाचं आपली आवड आहे. प्रत्येकाची चव आणि गरज वेगळी आहे,’ असं म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य
- कोणत्याही आंदोलनात हाणामारी करायची वेळ आली की राणे बंधू शेपुट घालुन पळ काढतात – वैभव नाईक
- दिनेश कार्तिक बनला ‘वेदर मॅन’, स्वत:च केला खुलासा
- साऊथम्पटनमधील पिचवर ‘हा’ स्कोअर पुरेसा ; टीम इंडियाच्या कोचचं भाकीत
- रोहित आणि गील यांनी रचली 10 वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागिदारी


