🕒 1 min read
मुंबई : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहीलेला जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना अखेर दुसऱ्या दिवशी सुरु झाला. न्युझीलंड संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला पाचारण केले. 3 गडी गमावत 146 धावांची मजल मारली होती. मात्र अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला.
या सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गील यांनी 62 धावांची अर्धशतकी सलामी दिली. यासह मागील दहा वर्षापासुन भारतीय सलामीवीरांच्या धावांचा दुष्काळ संपुष्टात आणला. तब्बल दहा वर्षानंतर कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीरांनी इंग्लंडच्या भूमिवर अर्धशतकी सलामी दिली आहे. रोहित शर्माने 34 तर शुभमन गीलने 28 धावांची खेळी या सामन्यात साकारली. यापुर्वी 10 वर्षापुर्वी लॉर्ड्स कसोटीत भारताकडुन सलामीवीर गौतम गंभीर आणि अभिनव मुकुंद या जोडीने 63 धावांची सलामी दिली होती. यानंतर रोहित आणि गील यांनी केलेली ही सर्वेच्च भागीदारी आहे.
या सामन्यात न्युझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात करत 62 धावांची सलामी दिली. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराने खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी काही वेळ घेतला. मात्र तो बोल्टचा शिकार बनला. यानंतर मात्र कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अंजिक्य रहाणे यांनी अधिक पडझड होऊ दिली नाही. यादरम्यान अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी भारतीय संघाने 3 गडी गमावत 146 धावांची मजल मारली होती.
महत्वाच्या बातम्या
- विराटने दाखवला अश्विन-जडेजावर विश्वास, म्हणाला…
- गिलला बॉल लागताच सिराजने केले असे काही ; होत आहे कौतुक
- ‘लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत, फक्त निवडणुकांची प्रतीक्षा आहे’
- ‘फादर्स डे’ निमित्त सचिनने शेअर केली भावुक पोस्ट
- ‘पुणेकर नागरिक या चमकोगिरीला कधीही माफ करणार नाहीत’, महापौरांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
